loader
Breaking News
Breaking News
Foto

संजय गुंजाळ यांची डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसीरत्न पुरस्कार- २०२६' साठी निवड

कोर्लई (राजीव नेवासेकर) - कोकण मराठी साहित्य परिषदेचे रायगड जिल्हा अध्यक्ष,प्रियदर्शनी फाऊंडेशनतर्फे पंडित नेहरू समाजरत्न पुरस्कार प्राप्त मुरुड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक खासदार सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक संजय पांडुरंग गुंजाळ यांची राष्ट्रीय ओबीसी, बहुजन शिक्षक संघ-(महाराष्ट्र राज्य)च्या डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसीरत्न पुरस्कार- २०२६' साठी निवड करण्यात आल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राष्ट्रीय ओबीसी, बहुजन शिक्षक संघ(महाराष्ट्र राज्य)चे प्रदेशाध्यक्ष अनिल नायपले व राज्य सरचिटणीस संतोष भोजने यांनी संजय गुंजाळ यांना दिलेल्या निवड पत्रात म्हटले आहे कि, आपण आजपर्यंत राष्ट्रीय, सामाजिक व शैक्षणिक कार्य करत असताना ओबीसी प्रवर्गातील वंचित, उपेक्षित व दुर्बल घटकांना त्यांचे संविधानिक अधिकार मिळावेत यासाठीही आपण मनोमन प्रयत्न करत असता. याच कार्याची दखल घेउन आपली निवड 'डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसीरत्न पुरस्कार -२०२६' साठी केलेली आहे. आपण ओबीसी प्रवर्गातील असल्याने आम्हांला आपला व आपल्या कार्याचा विशेष अभिमान आहे. आपल्या हातून भविष्यातही राष्ट्रनिर्मितीचे व समाजहिताचे कार्य घडावे.असे म्हटले आहे.

टाईम्स स्पेशल

कला, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील संजय गुंजाळ यांचे कार्य उल्लेखनीय असून गेली वर्षे कलासागर नाट्य संस्थेचे अध्यक्ष म्हणून यशस्वी धुरा सांभाळली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कट्टर समर्थक असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी राष्ट्रीय एकात्मता राखण्याचे यशस्वी काम केले आहे. सन २०११ चा ‘ॐ नम:शिवाय प्रतिष्ठान’चा ‘बाळशास्त्री जांभेकर’ हा राज्यस्तरीय पुरस्कार, सन २०१०चा रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाऊंडेशनचा ‘सांस्कृतिक व कला पुरस्कार’ तसेच रायगड सांस्कृतिक कला मंडळ, महाराष्ट्र राज्य रजि.चा "कोकण रत्न पुरस्कार २०२५ मिळाला आहे. शहरातील हिंदू-मुस्लीम ऐक्य राखण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. कला साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या सामाजिक सेवेची पोच पावती संजय गुंजाळ यांची डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसीरत्न पुरस्कार २०२६' साठी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg