दोडामार्ग (प्रतिनिधी) - आडाळी एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या कथित खनिजयुक्त माती चोरी आणि बेकायदेशीर उत्खनन प्रकरणाची गंभीर दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसमोरच सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनी करून तात्काळ चौकशी व कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणात संबंधित महसूल व पोलीस यंत्रणेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे निदर्शनास आणून देत शिवसेना शिष्टमंडळाने कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी उद्योगमंत्री सामंत यांनी दोन दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याचे संकेत दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
आडाळी एमआयडीसी परिसरात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात खनिजयुक्त लाल मातीचे उत्खनन करून ती बाहेर नेली जात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर दोडामार्ग शिवसेना आक्रमक झाली होती. तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती उपसभापती गणेशप्रसाद गवस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली असता अनेक ठिकाणी डोंगर कापल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या प्रकरणाची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांना देण्यात आली होती.
त्यानुसार रत्नागिरी येथे भेट घेऊन सविस्तर निवेदन, छायाचित्रे व अन्य पुरावे सादर करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती उपसभापती गणेशप्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, तालुका संघटक गोपाळ गवस, उपतालुकाप्रमुख बाबाजी (दादा) देसाई, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, सासोली सरपंच बळीराम शेट्ये, विलास सावंत, विशांत तळवडेकर, सुनील गवस तसेच अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.











































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.