loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी येथे जागतिक सिझोफ्रेनिया जागृती दिन साजरा

खेड (प्रतिनिधी) - जागतिक सिझोफ्रेनिया दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी येथे वैद्यकीय अधीक्षक संघमित्र फुले यांच्या मार्गदर्शनाखाली सिझोफ्रेनिया जागृती दिन साजरा करण्यात आला. इतरांनी तुमच्यावर लावलेला शिक्का काढून टाकणे आणि स्वतःची खरी ओळख व कहाणी स्वतःच्या शब्दांत लोकांसमोर मांडणे हे यावर्षीचे घोषवाक्य आहे. या प्रमाने आपण वर्षभर याचा अवलंब करणार आहोत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सिझोफ्रेनिया एक गुंतागुंतीचा मानसिक आजार असून तो औषधोपचाराने बरा होऊ शकतो आणि रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो असे प्रतिपादन वैद्यकीय उपअधीक्षिका डॉ. हरीनक्षी गोसावी यांनी केले. तसेच चुकीच्या रुढी परंपरा व अंधश्रद्धा यांना बळी न पडता लवकरात लवकर निदान, वेळेवर औषधोपचार, समुपदेशन व पुनर्वसन करून रुग्ण मुख्य समाजिक प्रवाहात समाविष्ट होऊ शकतो. असे वैद्यकीय अधिकारी तथा मानसोपचार तज्ञ डॉ. राहुल मोगले यांनी मार्गदर्शन केले.

टाईम्स स्पेशल

यावेळी डॉ शुभम तवर, मेट्रन नम्रता नाचणकर, रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक व इतर रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होत. यावेळी आभार प्रदर्शन मनोविकृती परिचारिका रितिका गावडे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg