loader
Breaking News
Breaking News
Foto

सुट्टी संपवून दापोलीला निघाले, पण वाटेत कंटेनरला पोलादपूरजवळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक , आई आणि मुलीचा जागीच मृत्यू

रायगड पोलादपूर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून शनिवारी दुपारी पोलादपूरजवळ झालेल्या भीषण अपघातात आई-मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालक वडिल गंभीर जखमी झाले आहेत. उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने मागून धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. अनिल मरकड हे आपल्या कुटुंबासह एमएच-08 एएन-2439 क्रमांकाच्या कारमधून नगर जिल्ह्यातील गावी सुट्टी घालवून दापोलीकडे परतत होते. पोलादपूर हद्दीतील हॉटेल बालाजी परिसरात आल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एमएच-04 एलवाय-1638 क्रमांकाच्या कंटेनरला त्यांच्या कारची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अपघातात सुवर्णा मरकड आणि अनुक्षी अनिल मरकड यांचा जागीच मृत्यू झाला. सुवर्णा मरकड या दापोली येथील स्टेट बँकेत वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होत्या. या दुर्घटनेमुळे मरकड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. डॉ. अनिल मरकड हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर माणगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर चिन्मय मरकड याला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी महाड येथे दाखल करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस आणि स्थानिक यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. कारचे मोठे नुकसान झाल्याने वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. त्यानंतर सर्वांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर गंभीर जखमी डॉ. अनिल मरकड यांना पुढील उपचारांसाठी माणगाव येथे हलविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

दापोली स्टेट बँकेतील वरिष्ठ लिपीक सुवर्ण मरकड यांचे अपघाती निधन

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg