खारपाडा (प्रतिनिधी) - मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोल नाका बंद करण्याच्या मागणीसाठी दि. 25 मे पासून मुंबई गोवा जनआक्रोश समितीचे पदाधिकारी ठिय्या आंदोलनास बसले असून आता आंदोलन अधिक आक्रमक व निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे. तसेच दि. 29 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून आंदोलनकर्त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली, मात्र अत्यंत संतापजनक बाब म्हणजे अजूनपर्यंत पनवेल ग्रामीण पोलीस प्रशासन, NHAI अधिकारी, संबंधित शासकीय यंत्रणा, आमदार, खासदार किंवा कोणत्याही राजकीय नेत्याने उपोषणकर्त्यांची साधी भेटही घेतलेली नाही.
इतकेच नव्हे तर, आमरण उपोषण सुरू असतानाही कोणत्याही शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली नाही, यामुळे आंदोलनकर्त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून प्रशासनाच्या भूमिकेविरोधात संतापाची लाट उसळली आहे. आंदोलनकर्त्यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत म्हटले की, “रस्ते अपूर्ण, जीव धोक्यात आणि तरीही टोल वसुली सुरू… हा सरळसरळ कोकणवासीयांवर अन्याय आहे.. "टोल बंद झालाच पाहिजे!”, “जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनाचा निषेध!” अशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला असून, प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.