loader
Breaking News
Breaking News
Foto

खोपी गावचे नेतृत्व असलेले मुंबईतील उदयोजक विजयकुमार भोसले यांचे आकस्मित निधन

खेड - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील खोपी गावचे नेतृत्व असलेले विजयकुमार भोसले यांचे दिनांक 28 मे 2026 रोजी आकस्मिक निधन झाले. विजयकुमार भोसले हे गावावरून मुंबईला गेल्यानंतर अग्निशमक दलामध्ये रुजू झाले. परंतु नोकरीमध्ये त्यांचे मन रमेना, लोकांसाठी काहीतरी करावे या उद्देशाने सन 1991 साली त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन कांदिवली शिवसेना शाखा क्रमांक 152 चे शाखाप्रमुख झाले. त्यांनी शिवसेना उपविभाग प्रमुख चारकोप, गुहागर विधानसभा संपर्कप्रमुख तसेच 2014 गुहागर विधानसभा दमदारपणे लढवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थी वर्गाला ज्युनिअर कॉलेजसाठी तालुक्याला जावे लागते त्यासाठी गावात शिक्षण मिळावे म्हणून झटणारे आणि श्री. छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्था मुंबईचे दहा वर्ष अध्यक्ष पद भूषविणारे विजयकुमार भोसले यांचे 67 व्या वर्षी निधन झाले त्यांच्या या आकस्मित निधनाने संपूर्ण गावावरती शोककळा पसरली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg