दापोली (प्रतिनिधी) : दापोली पंचायत समितीने जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आणि मान. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने "दापोली तालुका स्वच्छ व सुंदर करणे" या अभियानांतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने दापोली शहरात मंगळवारी २ जून २०२६ रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत "प्लास्टिक मुक्त महा स्वच्छता श्रमदान" मोहिमेचे आयोजन केले असल्याची माहिती दापोली पंचायत समितीचे सभापती उन्मेष राजे यांनी दिली आहे.
दापोली पंचायत समितीने प्लास्टिक मुक्त महा स्वच्छता श्रमदान या मोहिमेंतर्गत दापोली शहर ते गिम्हवणे, दापोली शहर ते जालगाव, दापोली शहर ते टाळसूरे, दापोली शहर ते खेर्डी, दापोली शहर ते लाडघर मार्ग तसेच दापोली शहर ते मौजे दापोली या गावांकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांच्या सुमारे ५ कि.मी .परिसराची स्वच्छता करण्याचा निर्धार केला आहे. "प्लास्टिक मुक्त महा स्वच्छता श्रमदान" मोहीम राबवून परिसर प्लास्टिकमुक्त व स्वच्छ ठेवण्याचा मुख्य उद्देश दापोली पंचायत समितीच्या या अभियानाचा आहे. अशा या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या अशा अभियानात सर्व पंचायत समिती सदस्य, शासकीय कर्मचारी, सामाजिक संस्था, संत निरंकारी मंडळ, महिला मंडळे, बचत गट, युवक मंडळे तसेच छोटे व्यापारी, हॉटेल व्यावसायिक JCI, लायन्स क्लब, रोटरी क्लब हे सहभागी होणार आहेत.
प्लास्टिक मुक्त महा स्वच्छता श्रमदान अभियानाचा शुभारंभ दापोली शहरातील एस.टी. बसस्थानक येथे सकाळी ६.४५ वाजता होणार आहे. तरी या सर्वार्थाने महत्त्वाच्या अशा अभियानात तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन दापोली पंचायत समितीचे सभापती उन्मेष राजे यांच्यासह उपसभापती नम्रता तोडणकर, तसेच जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी यांनी केले आहे.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.