loader
Breaking News
Breaking News
Foto

फसवणुकीच्या उद्देशाने ग्राहक नोंदणी रजिस्टर चोरी करणाऱ्या टोळीपैकी एकास कर्नाटकातून अटक

संगमेश्वर (प्रतिनिधी) - राजापूर व संगमेश्वर येथील हॉटेल तसेच लॉजिंग व्यवसायिकांच्या ग्राहक नोंदणी रजिस्टर चोरी प्रकरणातील चार संशयित आरोपींच्या शोधार्थ कर्नाटकात गेलेल्या राजापूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी अर्शद अहमद निसार अहमद पोकाकी (वय २५, रा. मुंडगोड, जि. उत्तर कन्नड, कर्नाटक) याला कर्नाटकातील हरपन्नहळ्ळी येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांतील हॉटेल व लॉजिंग व्यावसायिकांच्या ग्राहक नोंदणी रजिस्टरची चोरी करून ती दुसऱ्या टोळीला विकण्याचे काम ही टोळी करत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चोरी करण्यात आलेल्या रजिस्टरमधील ग्राहकांची वैयक्तिक माहिती व मोबाईल क्रमांकांचा गैरवापर करून त्यांना ब्लॅकमेल करणे, आर्थिक फसवणूक करणे तसेच खंडणी उकळण्याचे प्रकार कर्नाटकातील दुसरी मोठी टोळी करत असल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे. या प्रकारामुळे हॉटेल व लॉजिंग व्यवसायिकांसह ग्राहकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून या रॅकेटचा अधिक सखोल तपास सुरू असून इतर फरार संशयितांचा शोध घेतला जात आहे. तसेच चोरीस गेलेल्या नोंदणी रजिस्टरमधील माहितीचा गैरवापर कोठे आणि किती प्रमाणात झाला आहे, याचाही तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg