loader
Breaking News
Breaking News
Foto

लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार; गुन्हा दाखल

महाड - लग्नाचे आमिष दाखवून २५ वर्षीय तरुणीसोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी अप्पर तुडील, महाड येथील राहणाऱ्या एका ३२ वर्षीय तरुणाविरोधात महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर २०२५ ते १२ मे २०२६ या कालावधीत अप्पर तुडील येथील फिर्यादीच्या माहेरी असलेल्या घराच्या टेरेसवर हा प्रकार घडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आरोपी शहाजेब मुसा जुवेल (३२) हा फिर्यादी महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे भासवून तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावर विश्वास ठेवण्यास भाग पाडून तिची फसवणूक करत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच, घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

याबाबत पीडित महिलेच्या तक्रारीवरून ३० मे २०२६ रोजी महाड तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६४(२)(एम), ६९, ३५१(२) तसेच भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम ३७६(२)(एन), ३७६(क) व ५०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाड तालुका पोलीस करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg