loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी आमदार बाळासाहेब माने यांना कोंकण मतदार संघात उमेदवारी ,मोठी राजकीय खलबते

मुंबई : रत्नागिरीचे माजी आमदार बाळासाहेब माने यांना विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी मिळाल्याचे वृत्त असून खुद्द माने यांनी तशी सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे .पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना खासदार संजय राऊत , शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई साहेब, शिवसेना माजी खासदार विनायक राऊत , शिवसेना माजी मंत्री अनंतराव गीते , शिवसेना आमदार भास्करराव जाधव , आमदार अनिल परब , आमदार अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार बाळासाहेब माने यांना उमेदवारी मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माजी आमदार आणि उद्धव सेनेचे नेते बाळासाहेब माने यांनी आज श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन एबी फॉर्म स्वीकारत रत्नागिरीकडे प्रस्थान केले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रेरणा, उद्धवसाहेबांचे आशीर्वाद आणि जनतेचा विश्वास हाच माझा खरा आधार आहे,असे माने यांनी म्हटले आहे . दरम्यान कोंकण मतदार संघात मोठी राजकीय खलबते सुरु झाल्याचे म्हटले जात आहे .

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg