loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर चिपळूण मार्गावर वातानुकूलित ई-बसेस धावणार

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक हे कोकण दौऱ्यावर असताना चिपळूण येथे बसस्थानकाच्या पाहणीसाठी आले होते. त्यावेळी शिवसेना नेते, आमदार भास्करराव जाधव यांच्यावतीने त्यांचे जवळचे सहकारी नगरसेवक फैसल कास्कर, बाळा आंबुर्ले, अजय भालेकर, संतोष तांदळे यांनी त्यांचे स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानिमित्ताने आमदार भास्करराव जाधव यांनी चिपळूण गुहागर - असगोली मार्गावर ई - बस सेवा सुरू कराव्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या शिवशाही बसेस नादुरुस्त असल्याने जिल्ह्यासाठी शिवाई अथवा शिवनेरी या वातानुकूलित बसेस मिळाव्यात. या मागण्यांसंदर्भात पाठवलेल्या निवेदनाची ना. सरनाईक यांनी आवर्जून दखल घेतली आणि दोन्ही मागण्याबाबत तात्काळ निर्णय करू, असे आश्वासन दिले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg