दापोली (प्रतिनिधी) : पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या मॉन्सून मिशन III अंतर्गत आंतरराष्ट्रीय नि-कोरडवाहू उष्ण कटिबंधीय पिके संशोधन संस्था (इकीसेंट) (International Crops Research Institute for the Semi-Arid Tropics (ICRISAT)) भारतीय कृषि संशोधन परिषद (आय.सी.ए. आर) (Indian Council of Agricultural Research (ICAR)) केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था (क्रिडा) (Central Research Institute for Dryland Agriculture) आणि आंतरराष्ट्रीय पशुधन संशोधन संस्था (आय.एल. आर. आय.) (International Livestock Research Institute (IL.RI)) यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांच्या कृषि हवामानशास्त्र संशोधन प्रकल्पाअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित कृषि सल्लागर सेवा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.
हा प्रकल्प जून महिन्यापासून रायगड जिल्हयातील कर्जत तालुक्यातील सापेले आणि माणगांव या दोन गावांमध्ये प्रयोगिक तत्वावर राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषि हवामानशास्त्रज्ञ डॉ. वैभव राजेमहाडीक यांनी दिली. कृत्रिम बुद्धिमता आणि मशिन लर्निंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्यांना हवामान अंदाज, योग्य पेरणी कालावधी, कीड व्यवस्थापन आणि पीक व्यवस्थापन यासंबंधी सल्ला देण्यात येणार आहे. तसेच शेतकरी सर्वेक्षण आणि जनजागृती मोहिमाही या उपक्रमाअंतर्गत राबविण्यात येणार आहेत. प्रायोगिक टप्यातील अनुभव आणि निष्कर्षाच्या आधारे पुढील वर्षी हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत कर्जत तालुक्यातील सापले गावात शेतकरी फोकस ग्रुप डिस्कशन (FGD) आयोजित करण्यात आले यावेळी डॉ. रविंद्र मर्दाने, डॉ. नामदेव म्हसकर, स्मिता गावडे, डॉ. निखिल पातचापुर, एम. नागराजू, सचिन गुरव आणि प्रगतशिल शेतकरी अण्णा पवार उपस्थित होते.
हा एकजीडी कार्यक्रम दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे व संशोधन संचालक डॉ. पी. यु. शहारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. प्रकल्पाशी संबंधित शास्त्रज्ञांमध्ये हैदराबाद येथील भारतीय कृषि संशोधन परिषद-केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था (आय.सी.ए. आर. ब्रीडा) (Indian Council of Agricultural Research-CRIDA) चे डॉ. ए.व्ही. एम. सुभाराव तसेच आंतरराष्ट्रीय नि-कोरडवाहू उष्ण कटिबंधीय पिके संशोधन संस्था (इहीसेंट) (International Crops Research Institute for the Semi-Arid Tropics (ICRISAT)) चे डॉ. शालंदर कुमार आणि डॉ. किशोर कुमार यांचा समावेश आहे. गट चर्चे दरम्यान शेतकऱ्यांची हवामान बदल, हवामानातील अनिश्चितता आणि वाढत्या कृषि जोखमीचा शेती निर्णय प्रक्रियेवर होणारा परिणाम याबाबत आपले अनुभव मांडले. पीकनिहाय आणि पीक अवस्थेनुसार सल्ला, कृषि यंत्रसामुग्रीविषयी आगाऊ माहिती, स्थानिक परिस्थितीनुसार मार्गदर्शन, प्रभावी संवाद माध्यमे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित कृषि साधनांची आवश्यकता व्यक्त केली.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.