loader
Breaking News
Breaking News
Foto

भजन संगीतात भक्तिरसाची अवीट मैफल; पं. सुरेश बापट यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

रत्नागिरी : निवेंडी येथील प्रसिद्ध होराभूषण स्व. अनंत गोविंद तुपे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या भजन संगीताच्या कार्यक्रमात भक्तिरसाने ओथंबलेली सुरेल मैफल रंगली. निवेंडी येथील अनंत निवासस्थानी या कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली होती. प्रसिद्ध गायक पंडित सुरेश बापट यांनी आपल्या ओजस्वी आणि भावपूर्ण गायनातून श्रोत्यांना भक्तिसंगीताच्या विश्वात नेले. “तू हि निराकार”, “चटपटी लागेल हि नैननं”, “कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला”, “सुखाचे जें सुख चंद्रभागे तटी”, “लडीवाळ देवा मी बोलतो”, “चिंचेच्या पानावर देवूळ रचिले”, “श्री नारायण जय नारायण”, “माझ्या देहाची पालखी”, “दावा नयनी यशोदेचा सुकुमार”, “श्रीरंगा कमलाकांता”, “पांडुरंग श्रीरंग भजरे मना” या भैरवीसह “चला पंढरीस जाऊ रखमा” आदी भजनांनी वातावरण भक्तिमय झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पं. प्रभाकर कारेकर यांचे शिष्य असलेल्या पं. सुरेश बापट यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यांच्या गायनाला अमेय कारुळकर, श्रेयस व्यास आणि चिन्मय देशपांडे यांनी सुरेल गायन साथ दिली. हार्मोनियम व ऑर्गनवर वरद सोहनी, तबल्यावर सुहास चितळे, पखवाजावर कैलास दामले तर बासरीवर मंदार जोशी यांनी अप्रतिम साथसंगत करत कार्यक्रमाची रंगत अधिक खुलवली. यावेळी डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी स्वर्गीय अनंत तुपे यांच्या आठवणींना उजाळा दिला. अनंत तुपे हे हिराभूषण व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या काळात अनेक गरजूंना मदतीचा हात दिला होता. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि त्यांचे कार्य पुढील पिढीसमोर ठेवण्यासाठी या भजन मैफलीचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमादरम्यान डॉ. चंद्रशेखर निमकर यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. डॉ. अस्मिता निमकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. निबंध कानिटकर यांनी निवेदन केले. कार्यक्रमाला निमकर कुटुंबीय, नातेवाईक तसेच निवेंडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भजन, अभंग आणि वारकरी परंपरेतील निवडक रचनांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. उपस्थितांनी कलाकारांच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg