loader
Breaking News
Breaking News
Foto

जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल सुरू नको!’; खारपाडा टोलनाक्यावर उद्या कोकणकरांचा महाआक्रोश, थेट टोलबंदीसाठी आंदोलन

पनवेल : मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोलनाक्यावर टोलमाफी देण्यात आल्याचा दावा संपूर्णपणे खोटा आणि निव्वळ अफवा असल्याचे समोर आले आहे. राजकीय पक्षांचे नेते ’अर्ध्या हळकुंडात पिवळे’ होऊन टोलमाफीचे खोटे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आता स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. या फसवणुकीच्या निषेधार्थ आणि जोपर्यंत महामार्गाच्या रस्त्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत एकही रुपया टोल वसूल करू देणार नाही हा आक्रमक पवित्रा घेत, खारपाडा टोल पूर्णपणे बंद करण्यासाठी (टोलबंदीसाठी) येत्या रविवारी (३१ मे २०२६) सकाळी ११:०० वाजता खारपाडा टोलनाक्यावर भव्य जनआंदोलन छेडण्यात येणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोल बंद करण्यासाठी गेल्या २५ मे पासून सलग बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाला तीव्र स्वरूप देण्यासाठी रविवार, दिनांक ३१ मे २०२६ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता खारपाडा टोलनाका (पेण, जिल्हा रायगड) येथे ’जनआक्रोश समिती’ आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने महाआंदोलन पुकारण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या आंदोलनात संपूर्ण कोकणकर रस्त्यावर उतरणार असून, खारपाडा टोल बंद करूनच राहणार, असा निर्धार जनआक्रोश समितीने केला आहे. या जनआंदोलनात स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि सर्व कोकणकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सुरेंद्र पवार आणि संजय जांगम यांनी केले आहे. एमएच -४६ आणि एमएच -०६ क्रमांकाच्या वाहनांना टोलमाफीची घोषणा ’खोटी’! राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) कुठेही असं लेखी स्वरूपात दिलेले नाही की एमएच -०६ (पेण/रायगड) आणि एमएच -४६ (पनवेल) या क्रमांकाच्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. हा निव्वळ राजकीय नेत्यांनी पसरवलेला गैरसमज असून टोलनाका प्रशासनाने याबाबतची अधिकृत आणि खरी स्थिती जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. राजकीय पक्षांची आंदोलने फसवी, टोलमाफीचे कोणतेही लेखी आदेश नाहीत! राजकीय पक्षांची आंदोलने आणि दावे अत्यंत फसवे आहेत.

टाईम्स स्पेशल

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) कुठेही असं लेखी स्वरूपात दिलेले नाही की एमएच -०६ आणि एमएच -४६ या क्रमांकाच्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. हा निव्वळ राजकीय नेत्यांनी पसरवलेला गैरसमज आहे. टोलनाका प्रशासनाने याबाबतची अधिकृत आणि खरी स्थिती जाहीर करावी. जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोलवसुली पूर्णपणे बंदच झाली पाहिजे. या फसवणुकी विरोधात उद्या हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून टोलमुक्त महामार्गाच्या लढ्यात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे. टोलमाफी झाली तर मग आजच माझे ९५ रुपये का कट झाले? टोलमाफी झाल्याच्या खोट्या घोषणा करून राजकीय नेते फक्त जनतेची दिशाभूल करत आहेत. जर खरंच टोलमाफी झाली आहे, तर मग आमच्या वाहनांचे पैसे का कापले जात आहेत? माझ्या एमएच -४६-सीएच -१४५५ या क्रमांकाच्या वाहनाचे आज, ३० मे २०२६ रोजी सकाळी ०९:०८ वाजता खारपाडा टोल प्लाझा येथे फास्टटॅगद्वारे तब्बल ९५ रुपये कट झाले आहेत. (टॅक्स आयडी: पीएच६०५३००९३८६३२२२०). रस्त्याचे काम अजूनही अपूर्ण असताना अशा प्रकारे होणारी टोलवसुली म्हणजे सर्वसर्वसामान्य वाहनचालकांच्या खिशावर थेट दरोडा आहे. रितेश सावंत (त्रस्त वाहनचालक)

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg