loader
Breaking News
Breaking News
Foto

संघटित हिंदू शक्तीतूनच सामर्थ्यशाली भारत उभा राहील : सौरभ करडे

म्हसळा - सर्वसमावेशक आणि न्यायपूर्ण भारतासाठी हिंदू एकता अनिवार्य असून, आपण सर्वांनी जातीपातीचे भेद बाजूला ठेवून एकत्र येणे ही काळाची गरज आहे. संघटित हिंदू एकतेतूनच सामर्थ्यशाली भारत उभा राहू शकतो,” असे प्रतिपादन शिव व्याख्याते सौरभ करडे यांनी केले. म्हसळा शहरातील धावीर मंदिर परिसरात सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित ‘विराट हिंदू संमेलना’त ते बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सौरभ करडे यांनी ‘हिंदु धर्मावरील आघात मांडतांना मोठ्या प्रमाणात होणारे हिंदूंचे धर्मांतर, लव्ह जिहाद, मंदिर सरकारीकरण, गोहत्या, भूमी जिहाद आदी विषय आकडेवारीसहित मांडले. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना झाली पाहिजे, या विचाराने सकल हिंदु समाजाने एकत्र येऊन काम केले पाहिजे’, असे आवाहन केले.

टाईम्स स्पेशल

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख डॉ समीर साळुंखे, डॉ पल्लवी साळुंखे यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद नंदकुमार सावंत यांनी भूषवले, तर उपाध्यक्षपदी महादेव पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन करडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मंडळे, स्वयंसेवक, धार्मिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्ती व दानशूर नागरिकांचे आभार संयोजक यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg