चौक (अर्जुन कदम) - कोकण रेल्वेचे भाग्यविधाते, माजी रेल्वे मंत्री लोकनेते मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे टर्मिनलला देण्यात यावे, यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली असून राज्य सरकारचे आभार कोकण विकास समितीने मानले आहेत. कोकण रेल्वेचे भाग्यविधाते आणि माजी रेल्वे मंत्री मधू दंडवते यांचे कोकण रेल्वेसाठी असणारे योगदान लोकांच्या कायम स्मरणात राहण्यासाठी सावंतवाडी रेल्वे टर्मिनल ला द्यावे यासाठी कोकण विकास समिती सातत्याने पाठपुरावा करीत होती, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल होते, मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्याने कोकण विकास समितीने राज्य सरकारचे आभार व्यक्त केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे मंत्रालय, कोकणातील खासदार, आमदार तसेच विविध लोकप्रतिनिधींशी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्यात आला होता. कोकण रेल्वे प्रशासनाने लेखी उत्तराद्वारे हे प्रकरण राज्य शासनाच्या अखत्यारीत येत असल्याचे स्पष्ट केले होते. महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात ठराव मंजूर करून रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविल्यास पुढील कार्यवाही होऊ शकते, असेही कळविण्यात आले होते.
जून २०२३ मध्ये कोकण विकास समितीने मुख्यमंत्री यांच्याकडे सविस्तर प्रस्ताव सादर केला आणि चर्चाही केली होती, तत्कालीन आमदार व तथा विद्यमान मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर हेही होते. मुख्यमंत्री यांनी हा प्रस्ताव परिवहन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे अहवालासाठी पाठविला. परिवहन विभागाने २७ जून २०२४ रोजी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे आवश्यक अहवाल मागविला. याच काळात कोकण विकास समितीच्या वतीने जिल्हाधिकारी तावडे तसेच त्यांचे सहाय्यक शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली होती. जानेवारी २०२५ मध्ये सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्याशी चर्चा झाली असता, त्यांनी मळगाव ग्रामपंचायतीकडून अहवाल मागविण्यात आल्याची माहिती दिली. मार्च २०२५ मध्ये पंचायत समिती, सावंतवाडी यांनी मळगाव ग्रामपंचायतीचा अहवाल प्राप्त करून तो जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे पाठविला. सप्टेंबर २०२५ मध्ये या विषयाची माहिती मंत्री नितेशजी राणे यांना देण्यात आली. त्यांनीही सकारात्मक भूमिका घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून आवश्यक सहकार्य करण्याची विनंती केली. आमदार तथा पुनर्विकास व समूह विकास अध्यक्ष प्रवीणभाऊ दरेकर यांनीही सहकार्य केले.
जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी सविस्तर अहवाल कोकण विभागीय आयुक्तांकडे सादर केला. ऑक्टोबर २०२५ मध्ये मुद्देनिहाय अहवाल परिवहन विभाग, मंत्रालय येथे पाठविण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कक्ष अधिकारी विद्याराणी पवार, सहसचिव कोळेकर, अप्पर मुख्य सचिव (परिवहन) तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. दि. २६ मे, २०२६ च्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सहकारी मंत्री यांनी लोकनेते मधु दंडवते टर्मिनल या नावाने सावंतवाडी रेल्वे टर्मिनलचे नामकरण करण्यास मंजुरी दिली. लोकनेते मधु दंडवते यांनी कोकणाच्या विकासासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची दखल घेत अखंड कोकणवासीयांच्या मनातील भावना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कोकण विकास समिती आणि त्यांचे सदस्य अनंत वामन सावंत, अक्षय महापदी, प्रभानंद रावराणे आणि इतर सदस्यांनी केलेले योगदान आज यशस्वी ठरले असून महाराष्ट्र शासनाने त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले, ही कोकणवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे राज्य सरकारचे मनपुर्वक आभार व्यक्त केल्याचे कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत शंकरराव दरेकर यांनी व्यक्त केले.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.