loader
Breaking News
Breaking News
Foto

७ जून रोजी वैश्य समाज गुहागर तालुका यांचे ६ वे स्नेहसंमेलन

गुहागर - वैश्य समाज गुहागर तालुका यांचे ६ वे स्नेहसंमेलन रविवार दि. ७ जून २०२६ रोजी ओंकार मंगल कार्यालय, चिखली येथे सकाळी ९ ते सायं. ४ वा. आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ ते १० वा. अल्पोपहार, सकाळी १०.१५ वा. दिप प्रज्वलन, सकाळी १०.३० वा. सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थ्यांचा सत्कार, दुपारी १ ते २.३० वा. स्नेह भोजन, या स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी प्रसिध्द दिग्दर्शक मराठी व हिंदी चित्रपटांचे कास्टिंग डिरेक्टर रोहन रमाकांत म्हापुस्कर, (श्रीवर्धन), यशस्वी उद्योजक, उद्योगभुषण पुरस्कार प्राप्त रामकृष्ण उर्फ आबा कोळवणकर, (मुंबई ) यांची उपस्थिती लाभणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तरी या वैश्य समाज गुहागर तालुका स्नेहसंमेलन कार्यक्रम साठी सर्व समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रशांत शिरगावकर, उपाध्यक्ष विनायक कोळवणकर, सचिव डॉ. श्रीकृष्ण बेलवलकर यांनी केले आहे. ज्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभाग घ्यावयाचा असेल त्यांनी गुरुवार दि. ३।६।२०२६ पर्यंत अंतीम संसारे यांचेकडे संपर्क करावा. संपर्क क्रमांक ९४२०३७७९२३ / ७९७२९१२७६० इयत्ता १० वी, १२ वी व पदवीधर परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले नाव, गुणपत्रक आणि इयत्ता याची नोंद दिनांक ०३।०६।२०२६ पर्यंत संतोष उर्फ बापू संसारे यांचेकडे व्हॉटसॅपवर करावी. संपर्क क्रः ९४२१२३४२३ असेच समाजाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg