loader
Breaking News
Breaking News
Foto

​माणुसकीचे दर्शन:​ रात्रीच्या अंधारात मुक्या जिवाचा 'देवदूत' बनले कोळथरेचे तरुण

दापोली (​सागर गोवळे) - निसर्गातील प्रत्येक जीव वाचवणे ही काळाची गरज आहे, हेच दापोली तालुक्यातील कोळथरे येथील काही संवेदनशील तरुणांनी दाखवून दिले आहे. रात्रीच्या वेळी विद्युत खांबावरून खाली पडलेल्या एका घुबडाला मृत्यूच्या दाढेतून ओढून काढत, या तरुणांनी माणुसकीचे उत्तम उदाहरण पेश केले आहे. कोळथरे येथील प्रतीक जाधव यांच्या घरासमोरील विद्युत खांबावर रात्री ११:३० च्या सुमारास एक घुबड अचानक खाली कोसळले. घुबड जमिनीवर पडताच तिथे उपस्थित असलेल्या कुत्र्याने त्या असहाय्य पक्षावर झेप घेत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे उपस्थित असलेले प्रवीण तोडणकर, प्रतीक जाधव, प्रशांत जाधव आणि युवराज तोडणकर या तरुणांनी तत्काळ प्रसंगावधान राखले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घुबडासारख्या पक्ष्याला हात लावणे सुरुवातीला कठीण आणि भीतीदायक होते. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या तरुणांनी कोणतीही भीती न बाळगता कुत्र्याला दूर सारले आणि जखमी घुबडाला सुरक्षित स्थळी हलवले. जखमी अवस्थेत असलेल्या त्या घुबडावर या तरुणांनी प्राथमिक उपचार केले आणि त्याला योग्य औषध-पाणी दिले. ​काही काळ केलेल्या देखभालीमुळे घुबडाची प्रकृती सुधारली आणि त्याला पुन्हा मुक्तपणे आकाशात झेप घेण्यायोग्य बळ मिळाले. या तरुणांच्या धाडसी आणि संवेदनशील प्रयत्नांमुळे एका मुक्या जिवाला नवजीवन मिळाले आहे. त्यांच्या या कृतीचे परिसरातून कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg