loader
Breaking News
Breaking News
Foto

मळेवाड-आरोंदा मुख्य रस्त्यावरील गुळदुवे शेटकरवाडीतील खचलेला रस्ता धोकादायक; दुरुस्तीअभावी ग्रामस्थांमध्ये संताप

सावंतवाडी : मळेवाड-आरोंदा मुख्य रस्त्यावरील गुळदुवे शेटकरवाडी येथील रस्ता मागील अनेक महिन्यांपासून खचला असून अद्यापही दुरुस्ती न झाल्याने हा मार्ग दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनला आहे. रस्त्याच्या बाजूचा भराव कोसळल्यामुळे येथील पिण्याच्या पाण्याच्या तळी व बागायतीला धोका निर्माण झाला. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबाबत ग्रामस्थांबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मागीलवर्षी जून २०२५ मध्ये येथील शेटकरवाडी परिसरात मुख्य रस्त्याचा एक भाग बाजूने खचला होता. याबाब तात्काळ संबधित विभागाला माहिती देण्यात आली होती. त्यानंतर बांधकाम विभागाने तात्पुरत्या स्वरुपात धोकादायक ठिकाणी बॅरिकेट्स लावून दिवाळीनंतर दुरुस्तीचे काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, २०२६ उजाडले तरीही प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नाही. दरम्यान हा रस्ता अधिकच खचत व कोसळत असून याठिकाणी दोन्ही बाजूंनी वळण असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

टाईम्स स्पेशल

यासंदर्भात ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थांनी सह्यांचे निवेदन बांधकाम विभागाला देत तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. संभाव्य नुकसान व एखादी दुर्घटना होण्याआधी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अन्यथा अपघात झाल्यास बांधकाम विभाग जबाबदार असेल व येत्या आठ दिवसात रस्ता सुरळीत न झाल्यास रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गुळदुवे सरपंच शैलेश जोशी यांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg