रोहा(धम्मशील सावंत ) रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्तारित जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजीत या बैठकीत पक्ष संघटना अधिक सक्षम, सशक्त आणि तळागाळापर्यंत बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी युवा नेतृत्वाला प्राधान्य देत प्रमोद म्हसकर यांच्यावर पेण विधानसभा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. तसेच सामंत यांच्यावर पनवेल, उरण आणि कर्जत परिसरातील युवक संघटनेची जबाबदारी सुपूर्द करण्यात आली . युवकांना अधिकाधिक संधी देत सक्षम नेतृत्वाची नवी फळी उभी करण्याचा पक्षाचा मानस असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. बैठकीस राज्याच्या मंत्री आदिती तटकरे, विधान परिषद उमेदवार अनिकेत तटकरे, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, महिला जिल्हाध्यक्ष उमाताई मुंडे, स्नेहल जगताप, नगराध्यक्षा वनश्री शेडगे, मुरूड नगराध्यक्षा आराधना दांडेकर, राज्य प्रवक्त्या ॲड. सायली दळवी यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी व नेते उपस्थित होते. याशिवाय जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि विविध स्तरांवरील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
बैठकीत मार्गदर्शन करताना खासदार सुनील तटकरे यांनी संघटनाच पक्षाची खरी ताकद असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांनी गावागावांत जाऊन जनसंपर्क वाढवावा, पक्षाची धोरणे व विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवावीत आणि संघटनात्मक कामात अधिक सक्रिय व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. आगामी विधान परिषद निवडणुकीत महायुती राज्यातील सर्व १७ जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास व्यक्त करताना तटकरे यांनी अनिकेत तटकरे यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. पक्षाला आव्हानात्मक काळात भक्कम पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांचे त्यांनी विशेष आभार मानले. विविध स्तरांवरून झालेल्या टीकेलाही त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तर देत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. सध्या सुरू असलेल्या मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर पक्षाचे अधिकृत प्रतिनिधी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहितीही खासदार तटकरे यांनी दिली. जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या स्वाक्षरीने संबंधित प्रतिनिधींची नावे निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना तटकरे यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ जागांसाठी महायुती एकसंघपणे निवडणूक लढवत असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात समन्वयाने जागावाटपाची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सर्व जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अजित दादा यांच्या निधना नंतर माझ्यावर मोठे आरोप झाले,संक्रमनाच्या काळात कार्यकर्ता, नेता आणि नेतृत्व यांचं खरं नातं कळून येते. कार्यकर्ते भक्कम पणे माझ्या पाठीशी उभे राहिले असे तटकरे म्हणाले, यावर मी माझ्या भावना व्यक्त केल्या. असेही ते म्हणाले.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.