loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रभानवल्ली हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अनिता शिंदे यांचा सेवापूर्ती समारोह उत्साहात

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - आदर्श विद्यामंदिर प्रभानवल्लीच्या मुख्याध्यापिक अनिता शिंदे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित करण्यात आलेला सेवापूर्ती गौरव सन्मान सोहळा सत्कार समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आदर्श विद्यामंदिर माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. या समारंभाचे अध्यक्षस्थान श्री देवी अदिष्टी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विठोबा चव्हाण यांनी भूषविले. कार्यक्रमाला सेक्रेटरी गणेश चव्हाण, कार्यध्यक्ष, जितेंद्र ब्रीद, खजिनदार मनोहर पांचाळ, शाळा समिती अध्यक्ष, मंगेश जाधव हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सदस्या विनिता गांगण तसेच लांजा पंचायत समितीचे सदस्य उमेश (दादा) पत्की उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी श्री देवी अदिष्टी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापकीय संचालक मंडळाचे सचिव विजयकुमार चौघुले, प्रभानवल्ली गावच्या सरपंच विद्या गावखडकर, खोरनिनको गावचे सरपंच, मुकेश गुरव, प्रभानवल्लीचे पोलीस पाटील प्रभुलकर तसेच केंद्रप्रमुख संतोष पडवणकर, तळवडे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक, रामचंद्र जाधव, आसगे हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका बावधनकर, गोविळ हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका जाधव, भांबेड हायस्कूलचे मुख्याध्यापक मुलानी, सहाय्यक शिक्षक मांडवकर, ऋषिकेश बेर्डे यांच्यासह तालुक्यातील अनेक शिक्षक व शिक्षणप्रेमी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी अनिता शिंदे यांनी तब्बल ३२ वर्षे शिक्षण क्षेत्रात निष्ठेने सेवा बजावत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि विद्यार्थीहित जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष उल्लेख केला. या प्रसंगी माजी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि हितचिंतक यांनी शिंदे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg