loader
Breaking News
Breaking News
Foto

उदय सामंतांकडून शिवसेना बीएलए पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक, संघटन बळकटीसाठी शिवसेनेचा निर्धार

चिपळूण - आज चिपळूण येथील अतिथी सभागृहात शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत ह्यांनी रत्नागिरी जिल्हा (उत्तर) शिवसेना बीएलए (BLA) पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची आढावा बैठक घेतली. त्यावेळी सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीने संघटन अधिक मजबूत करण्याचा संकल्प करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पक्षाची खरी ताकद ही बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांवर अवलंबून असते. गावखेड्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून पक्षाची भूमिका आणि शासनाचे लोककल्याणकारी निर्णय घराघरांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे. प्रत्येक गरजू नागरिकाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे ही लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. आपण राजकारणापेक्षा 'विकासकारणावर' जास्त भर देतो. विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा आपल्या भागातील विकासकामे कशी वेगाने पूर्ण होतील, याकडे लक्ष द्या. जनतेचा विकास हेच आपले मुख्य ध्येय असायला हवे याबाबत ना. उदय सामंत ह्यांनी मार्गदर्शन केले.

टाईम्स स्पेशल

या बैठकीला माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार संजय कदम, लोकसभा संपर्कप्रमुख राजेश मोरे, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, राजेश बेंडल, नगराध्यक्ष उमेश सपकाळ यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, सर्व आघाड्यांचे प्रमुख आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg