loader
Breaking News
Breaking News
Foto

मनोज जरांगे पाटील यांचे तप्त उन्हात आंदोलन सुरु, मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचा पाठिंबा

अंतरवली, जालना - आजपासून मराठा क्रांतीचे नेते मनोज जरांगे ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापलेल्या उन्हात आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनामुळे पुन्हा एकदा मराठा समाजाच्या जाती दाखल्याचा प्रश्न पेटला आहे. डॉ. संजय लाखेपाटील राज्य समन्वयक यांनी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलनाला पठिंबा दिला असून मोठ्या संख्येने आता अंतरवलीकडे मराठा समाजाचे लोक एकत्रित येत आहेत. शासनाने यावर त्वरित मार्ग काढण्याची मागणी केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यासंदर्भात डॉ. संजय लाखेपाटील यांनी माहिती देताना म्हटले आहे. दि 02 सप्टेंबर 2025 च्या हैदराबाद गॅझेट शासन आदेशाच्या मुळ शब्दरचनेत शब्दच्छल करून; मराठे पात्र होऊन प्रमाणपत्रे मिळावीत अशी सुटसुटीत कार्यप्रणाली ( SOP) जाहीर करण्यात अपयशी ठरलेले आणि म्हणूनच मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्रे मिळणारच नाहीत अशी शब्द/कार्यपद्धती/रचना करून सन्मा मनोज जरांगे मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील‌ ऊपोषण आंदोलन आणि तमाम मराठा समाजाची जी फसवणूक मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ ऊपसमीतीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे त्याविरोधात श्री‌ मनोज जरांगे पाटील यांनी‌ ऊपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे

टाईम्स स्पेशल

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, न्याय मागण्यांना विखेपाटील यांनी ज्या पद्धतीने बासनात गूडाळून ठेवून या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ते अतिशय असंवेदनशीलतेचे प्रदर्शन करत आहेत तसेच ' 'मराठ्यांना आरक्षण दिले असे धांदात खोटे सांगून' नाहक मराठा ओबीसी असा वाद वाढवत आहेत म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने मराठा आरक्षण ऊपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला पाहिजे नसता राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्यांची तातडीने मत्रीमंडळातून हकालपट्टी करायला हवी, अशी‌ आग्रही मागणी आम्ही करत असून सदर हैदराबाद गॅझेट चा शासन आदेश हा 'वांझ' असून तो 'जननारच' नाही हेच तर आम्ही अभ्यासौन पहिल्या दिवसापासून सांगत होतो आणि तेच सत्य होते/आहे हे आता सिद्ध झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg