वरवेली (गणेश किर्वे) - टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी वतीने १९ वर्षांखालील मुला-मुलींची क्रिकेट स्पर्धा गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील गोल्डन पार्क मैदानात घेण्यात आली. ग्रामीण आणि शहरातील सुमारे १४० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट संकेत साळवी, उपाध्यक्ष उद्योजक ओंकार संसारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू, डॉ.योगिता खाडे आयरे, डॉ. विजय तांदळेकर उपस्थित होते.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड ४ जून रोजी उदगीर (जि. लातूर) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धांसाठी करण्यात येणार असल्याची माहिती निवड समिती प्रमुख डॉ. विजय तांदळेकर यांनी दिली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा संघटनेच्या सचिव डॉ. अंतरराष्ट्रीय खेळाडू योगिता खाडे (आयरे), प्रणीत सावंत, शशिकांत उदेग, मंदार साळवी, राहुल जामसूतकर, अंतरराष्ट्रीय खेळाडू हुजैफ़ा ठाकुर, पंच स्वप्निल धामणस्कर, कैलास पिळणकर, समालोचक चेतन गुरव यांनी सहकार्य केले.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.