सावंतवाडी (प्रतिनिधी) : सुमारे १५० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि सावंतवाडी शहराचे 'हृदय' समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक मोती तलावाचा पर्यटन दृष्ट्या सर्वांगीण विकास करून त्याला नवसंजीवनी दिली जाणार आहे. सावंतवाडी नगरपरिषद, राजघराणे आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विचाराने प्रकल्प उदयास येत आहे. येत्या ५ वर्षांत टप्प्याटप्प्याने हा विकास करण्याचा मनोदय नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले आणि युवराज लखमराजे भोंसले यांनी आज येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी तब्बल ५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, याचा सविस्तर विकास आराखडा (व्हिजन डॉक्युमेंट) महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्यासमोर सादर करण्यात आला आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले म्हणाल्या की, मोती तलावाचा विकास करताना त्याचा मूळ ऐतिहासिक लूक आणि वारसा जसाच्या तसा कायम ठेवला जाईल. या प्रकल्पाचे सादरीकरण पालकमंत्री नितेश राणे आणि माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले असून, या दोन्ही नेत्यांचा प्रकल्पाला भक्कम पाठिंबा व सहकार्य लाभणार आहे. 'रतन जे. बटलिबोई कन्सल्टंट्स प्रा. लि.' आणि 'ईडन एलएलपी' यांच्या सहकार्याने हा दूरदृष्टी आराखडा तयार करण्यात आला असून, माझ्याच कारकिर्दीत हा प्रकल्प साकारण्याचा माझा मानस आहे, असे त्यांनी सांगितले. पाण्यासाठी अत्याधुनिक फिल्टर प्लांट: तलावातील पाणी गढूळ होऊ नये आणि बाजूच्या भिंतींचे संरक्षण व्हावे यासाठी विशेष फिल्टर प्लांट बसवला जाईल. यामुळे केवळ स्वच्छ पाणीच तलावात जाईल, माती आत जाणार नाही. फूड प्लाझा आणि बोटिंग प्रोजेक्ट: तलावाच्या खाऊ गल्लीसाठीच्या आरक्षित भागात वाढ करून त्या ठिकाणी आधुनिक 'फूड प्लाझा' आणि 'बोटिंग प्रोजेक्ट' उभारला जाईल. फेस्टिव्हल मार्केट आणि हँडक्रॉफ्ट झोन: स्थानिक कलावंतांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी 'फेस्टिव्हल मार्केट' आणि 'हँडक्रॉफ्ट'साठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आली आहे. ओपन एम्पीथिएटर आणि व्ह्यू पॉईंट: राजवाड्याच्या समोरील भागात स्थानिक कला प्रकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी 'ओपन एम्पीथिएटर' उभारले जाईल. तसेच गणेश विसर्जनाचा भाग आकर्षक 'व्ह्यू पॉईंट' म्हणून विकसित केला जाईल. जागतिक दर्जाची बैठक व्यवस्था: पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी तलावाच्या काठावर ऐतिहासिक टच असलेली आणि तलावाच्या दिशेने पाहता येईल अशी सुंदर बैठक व्यवस्था केली जाईल.
यावेळी उपस्थित असलेले युवराज लखमराजे भोंसले म्हणाले, "३१ एकर परिसरात पसरलेला हा ऐतिहासिक मोती तलाव सावंतवाडीची शान आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून म्हणजेच शहराबाहेरून जाणारा पर्यटक शहराकडे कसा वळेल, यादृष्टीने हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल. मोती तलावाला जागतिक (ग्लोबल) स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, शासनाकडून या प्रकल्पासाठी जास्तीत जास्त निधी मिळवून आणू." या प्रकल्पामुळे सावंतवाडीच्या वैभवात भर पडणार असून, सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे. या पत्रकार परिषदेला शहरातील मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.



















































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)
































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.