loader
Breaking News
Breaking News
Foto

तुकाराम नटे यांचे दुःखद निधन

दापोली- दापोली तालुक्यातील धानकोली पंचक्रोशीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम धोंडू तथा दादा नटे यांचे त्यांच्या राहत्या घरी नुकतेच वृद्धापकाळ तसेच अल्पशा आजारपणाने दुःखद निधन झाल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. धानकोली यादववाडी येथील तुकाराम धोंडू नटे यांची संपूर्ण दापोली तालुक्यातील एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता तसेच कुशल संघटक अशीच ओळख आहे. धानकोली गावातील एकमेव अशा मोठ्या व एकत्र कुटुंबाचे ते कुटुंबप्रमुख होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यात शिवसेना संघटना तळागाळापर्यंत पोहोचविण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. अनेक सामाजिक कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधी तुकाराम नटे यांच्याच छायेत मोठे झाले व नावारूपास आले आहेत. पंचक्रोशीत कोणाही आपद्ग्रस्ताच्या किंवा अडचणीत सापडलेल्या कोणाही व्यक्तिच्या मदतीसाठी धावून जाताना त्यांनी कधी वेळकाळ पाहिली नाही. त्यांच्या सामाजिक विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज अनेक सामाजिक कार्यकर्ते आपापल्या क्षेत्रात पुढे जात आहेत.

टाईम्स स्पेशल

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तुकाराम नटे आजारी होते. नुकतेच त्यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या जाण्याने दापोली तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मृत्युसमयी त्यांचे वय ९० वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, जावई, सुनां, नातवंडे, भाऊ, पुतणे असा फार मोठा परिवार असून संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg