वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील गावांमधील २५ वाड्यांचा दरड प्रवणग्रस्त क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. या गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्याठिकाणी सूचवलेल्या उपाययोजनांबाबत कार्यवाही झाली, तसेच तेथील ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन संबधित ठिकाणांना स्थलांतणाबाबत नोटीस देऊन सदर स्थलांतरण काळजीपूर्वक कार्यालयाच्या समन्वयाने करण्याचे आदेश तहसीलदार परीक्षित पाटील यांनी दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे या गावातील वाड्यांमध्ये विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यासाठी २० नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक नोडल अधिकाऱ्यांना सदर ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देण्याबाबत कळवण्यात आले आहे.
दरडप्रवण क्षेत्रामध्ये वेलदूरमधील घरटवाडीतर्फे वेलदूर-नवगांव सिद्धेश्वरनगर, नवानगर विठ्ठलवाडी, धोपावेमधील धोपावे-तरीबंदर गुरववाडी, कोळीवाडीतर्फे चाळकेवाडी धोपावे, तेटले, अंजनवेलमधील पेठ अंजनवेल-भोईवाडी, पालशेत आगडीमंदिर, कचिंचबंदर वाडीखाते सावरपाटी, हेदवी-पालशेत तवसाळ रस्ता, परचुरीमधील परचुरी-डाफळेवाडी रस्ता, साखरीत्रिशुळमधील मोहल्ला म्हसकरवाडी रस्ता, पेवे गावातील सुतारवाडी रस्ता, कारुळमधील भूस्खलन वाड्यांमधील जांभळेवाडी, हुंबरेब्राडी, गुरववाडी, जोशीवाडी, वडद गावातील वडद बौद्धवाडी, वडद, कुडलीमधील कुडली-रेवसाबंदर रस्ता, तरीबंदर अबिरे रस्ता, आंबरेखुर्द गावातील ब्राह्मणवाडी रस्ता, आंबेरे-पाचेरी आंबेरे रस्ता, आंबेरेवाडी, पाचेरी आगर गावातील काजोळकरवाडी रस्ता, कोंडवाडी, भातगावमधील भातगांव मासू आंबेरे, असोरे, भातगाव रस्ता, काजुर्लीमधील काजुर्ली कुभारमळा, आवरे-असोरे गावातील असोरे घाटी, शिर गावातील महालक्ष्मी रस्ता, भातगाव तिसंग गावातील भातगाव तिसंग कोसबीवाडी सुवरेवाडी, पाचेरी सडा गावातील बौद्धवाडी या ठिकाणांचा समावेश आहे.



















































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)
































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.