loader
Breaking News
Breaking News
Foto

बसणी पंचक्रोशीतील विहिरीचे रखडलेले काम अखेर सुरू, ठाकरे युवासेनेच्या पाठपुराव्याला यश

रत्नागिरी - तालुक्यातील बसणी पंचक्रोशीमध्ये गेल्या काही काळापासून पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी बसणी येथील एका पांडवकालीन तलावाजवळ मोठी विहीर बांधण्याचे काम दीड ते दोन वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते. मात्र, दुर्दैवाने गेली वर्षभर या विहिरीचे काम पूर्णपणे बंद अवस्थेत पडून होते. यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आणि पाण्यासाठी हाल अपेष्टा सहन कराव्या लागत होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या गंभीर परिस्थितीची दखल घेत युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक उपविभाग अधिकारी आराध्य महेश नेवरेकर यांनी युवासेना रत्नागिरी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांच्याशी संपर्क साधला आणि समस्येची तीव्रता त्यांच्या कानावर घातली. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी तात्काळ बसणी गावाला प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी या अर्धवट राहिलेल्या विहिरीच्या कामाची सविस्तर पाहणी केली. काम रेंगाळल्याचे पाहून त्यांनी जागेवरूनच संबंधित कंत्राटदाराला फोन लावून त्याची चांगलीच कानउघडणी केली.

टाईम्स स्पेशल

तसेच, कोणत्याही परिस्थितीत आगामी पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे कडक आदेश दिले. युवासेनेच्या या आक्रमक पवित्र्यानंतर कंत्राटदाराने विहिरीचे रखडलेले बांधकाम पुन्हा सुरू केले आहे. वर्षभर बंद असलेले काम अखेर सुरू झाल्यामुळे बसणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पाण्याची चिंता मिटण्याची आशा निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी युवासेनेचे मनापासून आभार मानले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg