loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई प्रदेश मराठा क्रांती स्वराज्य संघटनातर्फे अन्नधान्य व मोफत जीवनावश्यक वस्तू वाटप

मुंबई (प्रतिनिधी) - मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण, राष्ट्रीय मिडिया अध्यक्ष अभिजित दरेकर, राष्ट्रीय रोजगार उद्योग विभाग अध्यक्ष उद्योजक अजय तिडके यांच्या सुचनेनुसार मुंबई प्रदेश अध्यक्ष उद्योजक व विकासक डॉ चंद्रकांत तुळशीराम मोजाड, राज्य उपाध्यक्ष गुरुदेव दत्तात्रय झेंडे आणि मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा आरती बबनराव दळवी यांच्या सौजन्याने तसेच शिवसेना शाखा खार यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला असल्याचे मराठा क्रांती स्वराज्य संघटना मुंबई प्रदेश संघटक गणेश चौधरी यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या वेळी बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना राज्य उपाध्यक्ष व खार शिवसेना शाखाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दत्तात्रय झेंडे यांनी सांगितले. रविवार दिनांक ३१ मे रोजी दुपारी बारा वाजता हा स्तुत्य उपक्रम खार येथील पाली पठार आंबेडकर रोड येथे आयोजित करण्यात आला. ज्यात गहू, तांदूळ व अन्य जीवनावश्यात आवश्यक जिन्नस देण्यात आली. मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा आरती बबनराव दळवी व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष भाई गुरुदेव दत्तात्रय झेंडे यांचे विशेष आभार मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी मानले व त्यांच्या कार्यकर्त्यांना पदाधिकारी यांचे अभिनंदन केले. हा स्तुत्य उपक्रम खार पश्चिम येथे आयोजित करण्यात आला होता. समाजातील गोर गरीब गरजु यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले असता किमान २५० गरजवंताना सुमारे २२ किलोचे किट तयार करून वाटण्यात आली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg