loader
Breaking News
Breaking News
Foto

मान्सूनपूर्व आरोग्य तपासणी व असांसर्गिक आजार तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - प्राथमिक आरोग्य केंद्र धामापूर अंतर्गत उपकेंद्र वाशी, उपकेंद्र तुळसणी तसेच उपकेंद्र नादळंज अंतर्गत उजगाव येथे दि. 31 मे 2026 रोजी मान्सूनपूर्व आरोग्य तपासणी अभियान तसेच "माझं गाव आरोग्य संपन्न गाव" अभियानांतर्गत असांसर्गिक आजार तपासणी शिबिर (NCD) आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, डोळ्यांचे विकार, सांधेदुखी आदी आजारांची तपासणी करण्यात आली. लाभार्थ्यांना किरकोळ औषधोपचारासह समुपदेशन, आरोग्य मार्गदर्शन आणि आवश्यक संदर्भसेवांबाबत माहिती देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करून नागरिकांना निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून देण्यात आले. "१०० दिवस क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम" अंतर्गत संशयित रुग्णांच्या एक्स-रे तपासणीचे विशेष अभियान राबविण्यात आले. यामध्ये एकूण 232 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी वाशी येथे 134, तुळसणी येथे 76 आणि उजगाव येथे 22 नागरिकांचे एक्स-रे काढण्यात आले. शिबिरादरम्यान लाभार्थ्यांची आयुष्मान भारत जन आरोग्य योजना अंतर्गत "आयुष्यमान भारत वय वंदना कार्ड" काढण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.

टाईम्स स्पेशल

यावेळी तालुकास्तरीय अधिकारी सचिन जाधव, यश साठे, अशोक बोरसे (आरोग्य सहाय्यक), प्रशांत आहिरे (आरोग्य निरीक्षक) तसेच उपकेंद्र वाशी, तुळसणी व नादळंज येथील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. या आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून ग्रामीण भागातील आरोग्य जनजागृतीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg