loader
Breaking News
Breaking News
Foto

ओबीसी आरक्षणाला हात लावला तर रस्त्यावर उतरूः, तायवाडेंच्या इशाऱ्याने सरकार अलर्ट मोडवर

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भर उन्हात आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा, यासाठी जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्याचवेळी ओबीसी संघटनांनीही आपली भूमिका अधिक तीव्र केली आहे. नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मराठा समाजाच्या आंदोलनाला त्यांचा विरोध नाही. मात्र, ओबीसींच्या आरक्षणात कपात किंवा हस्तक्षेप स्वीकारणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राष्ट्रीय ओबीसी महासंघ सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे तायवाडे यांनी स्पष्ट केले. मात्र, ही भूमिका कायमस्वरूपी नसल्याचेही त्यांनी नमूद केले. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करताना विद्यमान ओबीसी आरक्षण अबाधित राहिले पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. सरकारने ओबीसी समाजाच्या हक्कांवर कुठलाही आघात होऊ दिला, तर तीव्र आंदोलन उभे राहील, असे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनासोबतच ओबीसी संघटनांची भूमिका देखील सरकारसाठी मोठे टेन्शन ठरत आहे.

टाइम्स स्पेशल

यावेळी तायवाडे यांनी सगे सोयरे अध्यादेशावरही मोठं विधान केलं. मनोज जरांगे पाटील सातत्याने या कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी करत असले, तरी या अध्यादेशाची प्रक्रिया आधीपासूनच सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे या मुद्द्यावरून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का देण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. जर सरकारने कोणत्याही दबावाखाली येऊन ओबीसींच्या कोट्यात हस्तक्षेप केला, तर त्याचे गंभीर परिणाम होतील ,असा इशारा त्यांनी दिला आहे .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg