loader
Breaking News
Breaking News
Foto

झाडावरून पडून कडवईत ५२ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी मृत्यू

​संगमेश्वर: घरावर आलेली आंब्याची फांदी तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या एका ५२ वर्षीय प्रौढाचा झाडावरून जमिनीवर पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिलीप बाळ्या धामणाक (वय ५२ वर्षे, रा. धामणाकवाडी, कडवई, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ​पोलीस अहवालानुसार, ही घटना मंगळवार, दिनांक २६ मे २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. दिलीप धामणाक हे आपल्या घराच्या छतावर आलेली आंब्याच्या झाडाची फांदी तोडण्यासाठी झाडावर चढले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र, झाडावरून अचानक त्यांचा तोल गेला आणि ते थेट खाली जमिनीवर पडले. या भीषण अपघातात त्यांच्या उजव्या डोळ्याला आणि उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली, तसेच डोळ्यातून मोठा रक्तस्राव झाला. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी प्रथम संगमेश्वर येथील डॉ. दौंड यांच्याकडे नेण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील वालावलकर रुग्णालय, डेरवण येथे हलवण्यात आले.

टाईम्स स्पेशल

परंतु, रुग्णालयात उपचार सुरू करण्यापूर्वीच तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून 'मृत' घोषित केले. ​या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिनांक २९/०५/२०२६ रोजी रात्री २०.५३ वाजता अकस्मात मृत्यू (आमृ. क्रमांक २१/२०२६, बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे) नोंद करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg