मुंबई :कोकणात विधान परिषद निवडणुकी संदर्भात जोरदार खलबते सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर निर्णय घेताना महायुती म्हणून आपण सारे एकत्र राहणार आहोत असे सांगितले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कोकणातील नेते आणि आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, निलेश राणे आणि भरत गोगावले यांची उपस्थिती होती. रायगड विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला गेल्यानंतर सर्व आमदार आणि नेत्यांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांनी युती धर्म पाळावा अशी सूचना यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. उद्या अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत.
मात्र दुसरीकडे अद्यापही रायगडच्या पालकमंत्रिपदावर कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान रायगड विधान परिषदेची जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादीला गेल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते महेंद्र दळवींची मुलगी जुईल दळवी या आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचा निर्णय देखील या बैठकीमध्ये झाला आहे. रायगड विधान परिषदेमधून आता अनिकेत तटकरे हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत.
दरम्यान काल अनिकेत तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतले होती. आता एकनाथ शिंदे यांनीच कोकणातील आमदारांना आदेश दिल्याने अनिकेत तटकरे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.



































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.