loader
Breaking News
Breaking News
Foto

७० लाखांची एम.डी. क्रिस्टल पावडर जप्त; तिघे आरोपी अटकेत

ठाणे (प्रतिनिधी) - एम.डी. (मेफेड्रॉन) क्रिस्टल पावडर हा अंमली पदार्थ मुंब्यावरून मुंबईला विक्रीसाठी जाताना जुना खारीगांव टोलनाक्याजवळून तिघा आरोपींना ठाणे गुन्हे शाखा, घटक-१, पोलिसांनी ताब्यात घेऊन एकुण ५००.०५ ग्रॅम वजनाची ७० लाख/-रू. किं. ची M.D. (mephedrone) क्रिस्टल पावडर सह असा एकुण ७७ लाख ५५ हजार ९५०/- रू. किंमतीचा माल जप्त केला. अटक आरोपीला ०२ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काही इसम त्यांच्या ताब्यात एम.डी. (मेफेड्रॉन) क्रिस्टल पावडर हा अंमली पदार्थ सोबत बाळगुन विक्रीकरीता मोटार स्कुटरने मुंब्यावरून मुंबईला जाण्यासाठी जुना खारीगांव टोलनाक्याजवळून २७ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वा ते ८ वा च्या दरम्यान जाणार आहेत. अशी बातमी गुप्त बातमीदारांकडून मिळाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे चे पोलीस पथकाने खारीगांव टोलनाका याठिकाणी सापळा रचून आरोपी रहमान अब्दुल खान, (२३), राह. अरूण मंजील, रू नं १०८, जीवन बाग, मुंब्रा, ठाणे. सिद्धांत संजय तांबोली, (३१), संदीप स्मृती अपार्टमेंट, रू नं ५, बि.आर. नगर समोर, दिवा आगासन रोड, दिवा पुर्व, ठाणे. साहील नसीम खान, (१८) राह झोपडपटटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाजवळ, कळवा पुर्व, ठाणे. यांस त्याच्या सुझुकी अ‍ॅक्सेस मोटार स्कुटर क्र. MH-04-NA1428 व MH-04-MX-3532 या २ मोटार स्कुटरसह ताब्यात घेतले. त्याच्या व वाहनाच्या झडतीमध्ये एकुण ७० लाख/-रू. किं. ची ५००.०५ ग्रॅम वजनाची व्यापारी मात्रा असलेली M.D. (mephedrone) क्रिस्टल पावडर हा अंमली पदार्थ व एक देशी बनावटीचे पिस्टल १ जिवंत काडतुस सह असा एकुण ७७ लाख, ५५ हजार ९५०/- रू. किंमतीचा माल मिळून आल्याने त्याच्या विरूध्द कळवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस अ‍ॅक्ट १९८५ चे कलम ८ (क), २२ (क), २९ सह आर्म अ‍ॅक्ट कलम ३,२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१), १३५ प्रमाणे २८ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

या गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखा, घटक-१, ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक अमित यादव हे करीत आहेत. सदरची कामगिरी अमरसिंह जाधव पोलीस उप आयुक्त, गुन्हे ठाणे, शेखर बागडे - सहा. पोलीस आयुक्त, शोध १, गुन्हे शाखा, ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सचिन गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे, अमीत यादव सहा. पोलीस निरीक्षक, प्रकाश शिरसाठ-पोलीस उप निरीक्षक, पोहवा /अविनाश पाटील, संदीप महाडिक, नंदकुमार पाटील, धनंजय आहेर, मुकुंद आव्हाड, शशिकांत सावंत, मपोह/ दिपाली जाधव, पोशि/अमोल ढावरे, प्रशांत लवटे, मयुर लोखंडे, सागर सुरळकर यांनी केलेली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg