loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी पोलिसांची धडक कामगिरी; वसतिगृहातून पळून गेलेल्या 'त्या' तीन अल्पवयीन मुलींना शोधले

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका वसतिगृहातून काल शुक्रवारी रात्री उशिरा दरवाजा तोडून पळून गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींना शोधण्यात सावंतवाडी पोलिसांना अवघ्या काही तासांत यश आले आहे. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली २५ पोलिसांच्या फौजफाट्याने रात्रभर कसून शोधमोहीम राबवत आज शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास या तिन्ही मुलींना सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले. ​मिळालेल्या माहितीनुसार, चार भिंतींच्या वातावरणाला कंटाळलेल्या या तीन मुलींनी रात्री उशिरा वसतिगृहाचा दरवाजा तोडला आणि तिथून पळ काढला. मुली बेपत्ता झाल्याचे व्यवस्थापनाच्या लक्षात येताच वसतिगृह प्रशासनाची एकच धावपळ उडाली. त्यांनी तातडीने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी तात्काळ सूत्रे हलवली. झोपेतून जागे झालेल्या २५ पोलीस कर्मचाऱ्यांची चार विशेष पथके तयार करून त्यांना तातडीने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. पोलीस ठाण्याचा हा संपूर्ण फौजफाटा रात्रीच शहरात व तालुक्यात ठिकठिकाणी रवाना झाला. ​मुलींचा सुगावा लावण्यासाठी पोलिसांनी एसटी बस स्थानके, रेल्वे स्टेशन, मुख्य चौक आणि शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर रात्रभर कसून तपासणी सुरू ठेवली. संशयित ठिकाणांची आणि वाहनांची रात्रभर झाडाझडती घेतली जात होती. अखेर पोलिसांच्या या अथक प्रयत्नांना आज सकाळी यश आले. एका गोपनीय माहितीच्या आधारे, सकाळी १० वाजताच्या सुमारास या तीनही अल्पवयीन मुलींचा शोध लागला.

टाईम्स स्पेशल

पोलिसांनी त्यांना सुरक्षितरीत्या ताब्यात घेऊन पुढील आवश्यक कायदेशीर प्रक्रिया व समुपदेशनासाठी पोलीस ठाण्यात आणले आणि त्यानंतर त्यांची पुन्हा वसतिगृहात रवानगी करण्यात आली. पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे वसतिगृह प्रशासन आणि पालकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. या मुलींनी नेमके कोणत्या कारणासाठी हे पाऊल उचलले, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg