loader
Breaking News
Breaking News
Foto

वायरी येथे कारची वीज खांबाला धडक

मालवण (प्रतिनिधी) - मालवण वायरी रस्त्यावरून तारकर्ली देवबागच्या दिशेने जाणाऱ्या पुणे येथील पर्यटकांच्या कारने श्री केळबाई मंदिरासमोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या वीजखांबाला धडक दिल्याची घटना घडली. कारच्या धडकेनंतर सिमेंटचा वीज खांब कारवर वाकलेल्या स्थितीत राहिल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. यावेळी स्थानिकांनी वीज खांब कारपासून बाजूला केल्यावर वीज वितरण कंपनीकडून हा वीज खांब बदलण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथून मालवणात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची कार वायरी रस्त्यावरून तारकर्ली देवबागच्या दिशेने जात होती. यावेळी कारमधील चालकाच्या बाजूला बसलेल्या लहान मुलाने स्टेअरिंगला हात लावल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून केळबाई मंदिरासमोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या वीज खांबाला कारची धडक बसली. या धडकेमुळे वीज खांब मुळातून कलंडून कारवर वाकलेल्या स्थितीत राहिला. तर या धडकेत कारच्या डाव्या बाजूकडील दर्शनी भागाचे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कारमधील कोणालाही दुखापत झाली नाही. तसेच वीज खांब वाकलेल्या स्थितीत राहिल्याने मोठा अनर्थ टळला.

टाईम्स स्पेशल

हा अपघात घडल्यावर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नगरसेवक तपस्वी मयेकर, तेजस लुडबे, अमित मयेकर, समीर मयेकर, साहिल मयेकर, बाळू मयेकर यांच्यासह इतर स्थानिक नागरिकांनी वीज खांबाला दोरी बांधून तो मागे ओढून घेतल्यावर कार बाजूला करण्यात आली. वीज खांब वाकल्यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. यावेळी वीज कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत तातडीने वीज खांब बदलल्यावर वीज पुरवठा सुरळीत झाला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg