loader
Breaking News
Breaking News
Foto

तिलारी घाटात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ, घातपात केल्याची शक्यता चंदगड पोलिसांकडून तपास सुरू

दोडामार्ग (प्रतिनिधी) - गोवा दोडामार्ग बेळगाव कोल्हापूर जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटावरुन दोन किलोमीटर अंतरावर वीज निर्मिती जलवाहिनीकडे गेलेल्या आडरस्ता प्रेशर पॉईट जवळ झाडी झुडपात एका ३५ वर्षीय अनोळखी महिलेचा सडलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घातपात करून मृतदेह टाकला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही जण या ठिकाणी गेले असता दुर्गंधी आल्याने ही घटना उघडकीस आली. आडाळी कळसगादे पोलीस पाटील सदानंद विठू सुतार यांनी घटनेची माहिती चंदगड पोलीसांना दिली. तिलारी घाटात पंचनामा करून मृतदेह चंदगड ग्रामीण रुग्णालय येथे नेला. मृत महिलेची ओळख पटलेली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तिलारी घाटात या अगोदर देखील खुन करून दोन महिला तसेच चालक वाहक यांच्या मृतदेहाचे सांगाडे सापडले होते. हा घाटात धोकादायक तसेच खोल दरी यामुळे गुन्हेगार घातपात करून मृतदेह या घाटात किंवा आड वाटेला टाकतात. या घाटाच्या वर चेक पोस्ट नाही यामुळे कर्नाटक तसेच इतर ठिकाणी घातपात करून मृतदेह तिलारी घाटात टाकणे सहज सोपे झाले आहे. शिवाय थांगपत्ता लागत नाही. हा मृतदेह दुर्गंधी आल्याने समोर आले. तिलारी घाटात वीज निर्मिती करण्यासाठी जी पाईप लाईन आहे ती घाटात बोगदा खोदून आणली आहे येथे पाणी प्रेशर पॉईट आहे. बाजुला झाडी झुडपे आहेत. त्या ठिकाणी एक रस्ता केला आहे सहसा कुणी फिरकत नाही पण काही प्रेमी युगुल या ठिकाणी येतात. असेच कोणी या ठिकाणी गेले असता रस्ता बाजूला झाडीत सडलेला महिलेचा मृतदेह आढळून आला. यामुळे खळबळ उडाली आहे.

टाईम्स स्पेशल

मृतदेह आढळल्याचे समजताच चंदगड पोलीस उप निरीक्षक आकाश भिंगारदिवे, सर्व टीम तिलारी घाटात दाखल झाली. सदर महिलेचे वय ३० ते ३५ अंदाजे आहे. तिच्या अंगावर मोर पिसी सोनेरी साडी, लाल सोनेरी ब्लाऊज, तसेच पायात पैजण जोडे आहेत मृतदेह सडला आहे. यामुळे ओळख पटणे कठीण झाले आहे. या ठिकाणी मृतदेह टाकला यामुळे घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. चंदगड पोलिसांकडून महिला कुठे बेपत्ता आहे का? याबाबत सर्वञ माहिती काढायला सुरुवात केली आहे. तिलारी घाटात अनोळखी महिला घातपात शक्यता अधिक आहे पाच ते सहा दिवसांपूर्वी मृतदेह टाकला असावा असा संशय आहे. चंदगड पोलिसांसमोर खुनाचा तपास करणे हे आवाहन आहे. कर्नाटक राज्यातील ही महिला असण्याची शक्यता आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूबाबत माहिती मिळणार आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी काही जणांनी गर्दी केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg