loader
Breaking News
Breaking News
Foto

महायुतीत बंडखोरी, शिंदे गटाच्या जुईली महेंद्र दळवी यांचा अपक्ष अर्ज दाखल

रत्नागिरी ( किशोर मोरे ) कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी (जुईकर) यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे。जुईली दळवी यांनी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि नेते सुनील तटकरे यांच्यावर अन्यायाचा थेट आरोप करत अपक्ष अर्ज भरला आहे。 राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे (सुनील तटकरे यांचे सुपुत्र) यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या प्रचारात सहभागी न होता तटस्थ राहण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे。या जागेवर शिवसेनेचा दावा असूनही राष्ट्रवादीने ती खेचून घेतल्याची स्थानिक कार्यकर्त्यांची भावना आहे, त्यामुळे जुईली दळवी यांच्या बंडामुळे रायगडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे。

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg