loader
Breaking News
Breaking News
Foto

आंजर्ले भंडारवाडा येथे उभारलेला ट्रान्सफॉर्मर सुरू कधी होणार ?

दापोली (प्रतिनिधी) - अनेक वर्ष करण्यात आलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे आंजर्ले भंडारवाडा येथे नव्याने ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आला आहे. हा ट्रान्सफॉर्मर उभारुन एक महिना पूर्ण झाला तरी अजूनही या ट्रान्सफॉर्मर वरून विदयुत पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे आंजर्लेत संताप व्यक्त करण्यात येत असून उभारलेला ट्रान्सफॉर्मर नेमका सुरू कधी करणार याचीच प्रतिक्षा आंजर्ले वासियांना लागुन राहिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातील आंजर्ले हे पर्यटनदृष्ट्या नावाजलेले एक गाव आहे. येथील कडयावरील श्री. गणपती मंदिर देवस्थान तसेच कासवांचे गाव म्हणून अलीकडेच आंजर्लेला मिळालेली ओळख यामुळे येथे सतत पर्यटकांचा येण्याचा वाढता ओघ वाढत चालला आहे. त्यामुळे येथे समुद्र किनाऱ्यावर तसेच गावात घरगुती राहण्याची सोय , एमटीडिसी मान्यता प्राप्त न्याहारी व निवास योजना, हाॅटेल तसेच पर्यटन आधारीत विविध उपक्रमांना विजेची नितांत आवश्यकता आहे. सतत कमी अधिक दाबाने सुरू असलेल्या विजेच्या प्रवाहासाठी आंजर्ले येथील रहिवाशांनी नव्याने ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी लावून धरली होती. ती ग्रामस्थांची मागणी सततच्या पाठपुराव्यामुळे मंजूर होवून नवीन ट्रान्सफॉर्मर उभारण्यात देखील आला आहे. नव्याने उभारण्यात आलेला हा ट्रान्सफॉर्मर उभारुन तब्बल एक महिना लोटला तरी अद्यापही या ट्रान्सफॉर्मर विद्युत पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही.

टाईम्स स्पेशल

ट्रान्सफॉर्मर हे एक विद्युत उपकरण आहे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनद्वारे दोन किंवा अधिक सर्किट्समध्ये विद्युत ऊर्जा हस्तांतरित करते. व्होल्टेज पातळी समायोजित करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर महत्त्वपूर्ण आहेत, ज्यामुळे ते वेगवेगळ्या अनुप्रयोगांमध्ये सुरक्षित आणि कार्यक्षम वीज वितरणासाठी आवश्यक आहेत. असे हे महत्वपूर्ण युनिट सध्याच्या वाढलेल्या उष्णतेच्या काळात विदयुत प्रवाहासाठी आवश्यक असून येथील पर्यटन व्यवसायाला पुरक असे हे युनिट आहे मात्र ते सुरू करण्यास विलंब का ? होतोय आणि ते सुरू करण्यासाठी मुहूर्त कधी मिळणार याकडेच अवघ्या आंजर्ले वासीयांचे लक्ष लागून राहिले आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg