loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सुशोभिकरणासाठी भिम युवा पँथर रत्नाागिरी संस्थेचेे मुख्याधिकार्‍यांना निवेदन

रत्नागिरी (वार्ताहर)- शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाशेजारील परिसराचे सुशोभिकरण करण्याबाबत भिम युवा पँथर (रजि.) या संस्थेच्यावतीने रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकार्‍यांना शुक्रवार दि. 29 मे 2026 रोजी निवेदन देण्यात आले. रत्नागिरी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळया परिसरातील पुरेशी लाईट व्यवस्था नसल्याकारणाने अंधाराचे सामाज्य असते. सदर परिसर हा रत्नागिरीतील प्रमुख सिव्हील हॉस्पिटल येथील चौक असून मोठ्या प्रमाणात लोकांची तसेच वाहनांची ये-जा असते. त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या परिसरात त्वरीत लाईटची व्यवस्था कार्यान्वित करण्यात यावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील गेटची उंची कमी असल्याकारणाने भटकी जनावरे तसेच कुत्रे आतमध्ये जाऊन अस्वच्छता करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तरी पुतळयासमोरील गेटची उंची वाढवावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नियमित स्वच्छ पाण्याने धुऊन परिसरातील साफसफाई करणे आवश्यक आहे, इत्यादी विविध मागण्याचे निवेदन मुख्याधिकारी यांनी देण्यात आले. यावेळी सदर समस्यासह अन्य समस्यासंदर्भात मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांच्याशी चर्चा करून लक्ष वेधण्यात आले. संबंधित मागण्याची तात्काळ कार्यवाही न केली गेल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संस्थेच्या वतीनेे देण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रितम आयरे, उपाध्यक्ष तुषार पवार, सुजित चवेकर, मंगेश जाधव, कार्याध्यक्ष उमेश कदम, सचिव शशिकांत कांबळे, सहसचिव सुनिल पवार व नरेश कांबळे, सल्लागार रविंद्र पवार, दिपक जाधव, तालुका संघटक समीर जाधव आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg