संगमेश्वर - कोकण रेल्वे मार्गांवरील संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकातील STBA काउंटर परवाना हा मंदार मोहन रहाटे यांनी अनधिकृत कागदपत्रे दाखल करून मिळवला असून त्याची शहानिशा करून त्वरित कारवाई करावी. अशी मागणी संगमेश्वर तालुका (उत्तर) भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील संजय सुर्वे यांनी एका लेखी पत्राद्वारे केली आहे.
याबद्दल सविस्तर माहिती अशी कीं, भाजप युवा मोर्चाचे संगमेश्वर तालुका अध्यक्ष स्वप्नील सुर्वे यांनी कोकण रेल्वेच्या क्षेत्रीय रेल प्रबंधक यांना एक पत्र दिलें असून यात म्हटल्याप्रमाणे निविदा प्रक्रियेद्वारे संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात नेमलेल्या तिकीट (STBA) काउंटर चालक मंदार मोहन रहाटे यांनी निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर आवश्यक कागदपत्रात पोलीस पडताळणी अहवाल हा जुन्या काळातील दाखल केला आहे. या काउंटर चालकाला अनधिकृत पणे तात्काळ तिकिटाचा काळाबाजार करताना रेल्वे सुरक्षा बळाच्या अधिकाऱ्यांनी पकडले होते त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्यांची नोंद ही पोलीस पडताळणी अहवालात येणे अपेक्षित होते. मात्र तसें झाले नाही कारण रहाटे यांनी या अगोदरचा पोलीस अहवाल कागदपत्रासोबत जोडला आणि तिकीट काउंटर परवाना मिळवला, असाही आरोप सुर्वे यांनी केला आहे. सुर्वे यांनी पुढे म्हटले आहे कीं सदर व्यक्तीकडे परवाना कायम ठेवणे हे प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वे चे नियम यांच्याशी प्रतारणा करण्यासारखे आहे. त्यामुळे सदर व्यक्तीचा परवाना तातडीने रद्द करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी.











































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.