loader
Breaking News
Breaking News
Foto

मसुरेतील श्री जैन भरतेश्वर मंदिरात अधिक महिन्यानिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रम

मालवण (प्रतिनिधी) - मसुरे येथील श्री जैन भरतेश्वर मंदिरात अधिक (पुरुषोत्तम) महिन्यानिमित्त बुधवार दि. ३ जुन रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त जैन रामेश्वर मंदिरात श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्राचा जप ब्राम्हणांकडुन केला जाणार आहे. श्री विष्णु सहस्रनामाने १००० तुलसीपत्र समर्पण हे नोंदणी केलेल्या भक्तांकडुन करुन घेतले जाणार असून यामध्ये कोणाला सहभागी व्हायचे असेल तर दि. १ जून पर्यंत मंदिरात शुल्कासहित नोंदणी नोंदणी करावी.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच संकष्टी चतुर्थी असल्यामुळे श्री गणपती अथर्वशिर्ष पठण होणार असून श्री देव भरतेश्वरावर १००० शीव नामावलीने बेलपत्र समर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर १२ श्री देव भरतेश्वराची आरती करुन कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी भाविकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg