loader
Breaking News
Breaking News
Foto

पालपेणे शाळा नं.२ च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अमित खांडेकर यांची निवड

वरवेली (गणेश किर्वे) गुहागर तालुक्यातील पालपेणे शाळा नं.२ च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अमित खांडेकर यांची निवड करण्यात आली. पालपेणे शाळा नं.२ च्या शाळा व्यवस्थापन समितीची सभा शाळेमध्ये पार पडली. या सभेमध्ये अध्यक्षपदी अमित गंगाराम खांडेकर, उपाध्यक्षपदी श्रावणी नरेश टाणकर यांची निवड करण्यात आली. या सभेला शाळेचे माजी मुख्याध्यापक दत्ताराम समगिस्कर, मुख्याध्यापक विश्वास सावंत, मदन गिजे, अशोक पाष्टे, मनोहर पवार तसेच माजी अध्यक्ष राजेश घाणेकर, माजी अध्यक्ष विनायक घाणेकर, सदस्य परेश कदम तसेच पवार सर, माजी उपाध्यक्ष सुहाना आदवडे व इतर सदस्य उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बोलताना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित खांडेकर यांनी सांगितले की, शाळा व्यवस्थापन समितीने माझ्यावर विश्वास ठेवून समितीचे अध्यक्षपद बिनविरोध दिले आहे, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी असून सर्वांच्या सहकार्यातून शाळेची शैक्षणिक प्रगती करण्यावर भर दिला जाईल. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास आणि पालक व शाळा यांच्यात अधिक दृढ समन्वय निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असेल. अमित खांडेकर यांचे अभिनंदन करण्यात येत असून शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg