loader
Breaking News
Breaking News
Foto

देवबाग हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी; वक्तृत्व स्पर्धा संपन्न

मालवण (प्रतिनिधी) - अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचालित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग या प्रशालेमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने प्रशालेमध्ये इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी या दोन गटांमध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. प्रारंभी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. रचना खोबरेकर यांचे हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शालेय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. दोन्ही गटांमधून वीस विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले. विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे - इयत्ता पाचवी ते सातवी- प्रथम - कौस्तुभ रमेश मांजरेकर, द्वितीय - खुशी वामन मेस्त्री, तृतीय-भार्गवी मोरेश्वर गावडे, उत्तेजनार्थ- देविका भालचंद्र कुबल. इयत्ता आठवी ते दहावी - प्रथम- चैतन्य विजय साळगावकर, द्वितीय- खूषी सिताराम नेवाळकर, तृतीय- वैष्णवी विश्राम गावडे आणि उत्तेजनार्थ- ऋषभ श्रीधर खराडे यांनी यश मिळविले. यावेळी प्रशालेचे कर्मचारी श्री. मांजरेकर, लिपिक श्री. खोबरेकर प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक गोसावी यांनी शाहू महाराजांबद्दल मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून मुख्याध्यापिका रचना खोबरेकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत स्पर्धामधून मुलांमध्ये सभाधीटपणा वाढण्यास मदत होते, त्यामुळे मुलांनी स्पर्धांमध्ये सहभागी होत रहावे, असे सांगितले.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. स्पर्धेचे परीक्षण धनश्री मांजरेकर आणि गोसावी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्था पदाधिकारी, प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांचे सहकार्य लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg