संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील कसबा जिल्हा परिषद प्रभाग समितीची सभा निमंत्रण वितरणातील गोंधळामुळे चांगलीच गाजली. सरपंच व ग्रामसेवकांना वेळेत निमंत्रण न मिळाल्यानेसरपंच /ग्रामसेवक उपस्थित न राहु शकल्याने सभेच्या सचिवावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच निमंत्रणपत्रिका केवळ व्हॉट्सअपवर पाठविल्याबद्दल पंचायत समितीच्या सभापती तथा सभेच्या उपाध्यक्षा शर्वरी वेल्ये यांनी सचिव शशिकांत त्रिभुवणे यांचे कान टोचले. शुक्रवारी (ता. ३) शास्त्रीपूल (आंबेड) येथील कुणबी भवनात कसबा प्रभाग समितीची सभा अध्यक्षा विशाखा कुवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी जिप अध्यक्ष तथा विद्यमान जिप सदस्य श्री, संतोष थेराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती शर्वरी वेल्ये, सुरेश माईन तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, सरपंच, महेश देसाई, उषाताई गुरव, लाणे, संजय बlलदे, रत्नाकर सनगरे, मिथुन निकम, आदी सरपंच उपस्थित होते. सरपंच, ग्रामसेवक तसेच अनेक अधिकाऱ्यांना वेळेत निमंत्रण मिळाले नसल्याचा मुद्दा सभेत उपस्थित करण्यात आला. काही अधिकाऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आले नसल्याची कबुली सचिवांनी दिल्यानंतर संतोष थेराडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच प्रभागातील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनाही निमंत्रण न दिल्याने सभेला अवघे सुमारे ५० हुन कमी ग्रामस्थ उपस्थित होते. त्यामुळे सभा रद्द करून नव्याने घेण्याची मागणीही काही ग्रामस्थांनी केली. यावेळी संतोष थेराडे यांनी मध्यस्थी करत उपस्थितांची समजूत काढली. कसबा, मुचरी व कडवई या तीनही प्रभागांची संयुक्त सभा घेऊन त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन थेराडे यांनी दिले. सभेत सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, महावितरण आदी विभागांच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. उमरे प्रादेशिक नळपाणी योजना अडीच महिने बंद असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागल्याचा मुद्दाही उपस्थित झाला.
यावेळी संबंधित लोकप्रतिनिधींनी या काळात नागरिकांच्या मदतीसाठी काय उपाययोजना केल्या, असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारला. त्यावर टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन केल्याचे सांगण्यात आले. निवडून आल्यानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठीही संबंधित लोकप्रतिनिधी गावात फिरकले नसल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली. काही ग्रामसेवकांना निमंत्रण देऊनही ते सभेला अनुपस्थित राहिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत अध्यक्षा विशाखा कुवळेकर, संतोष थेराडे आणि सभापती शर्वरी वेल्ये यांनी दिले. सभेतील बहुतांश प्रश्नांना उत्तरे आणि मार्गदर्शन संतोष थेराडे यांनीच दिल्याने प्रत्यक्ष अध्यक्षस्थानावर कोण होते, अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. विविध विषयांवर साधक-बाधक चर्चा झाल्यानंतर सभा संपन्न झाली.मात्र आजची सभा ही निव्वळ संतोष थेराडे यांच्या मुळेच पlरपडल्याचे बोलले जात आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.