देवरुख : येथे एक धक्कादायक आणि धाडसी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. एका सेवानिवृत्त फार्मासिस्टच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २,८७,२५० रुपये किमतीचे चांदीचे दागिने, भांडी आणि रोकड पळवून नेली आहे. या घटनेसल देवरुख परिसरामध्ये आणखी तीन बंद घरे ही फोडल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून पोलीस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.
ही चोरी देवरुख येथील अल्प बचत भवन समोर असलेल्या 'अपूर्वाई' बंगल्यात घडली. फिर्यादी अविनाश भालचंद्र बोंद्रे (वय ६२ वर्षे, व्यवसाय: सेवानिवृत्त फार्मासिस्ट) हे दिनांक ०२/०७/२०२६ रोजी सकाळी ०८.३० वा. ते दिनांक १०/०७/२०२६ रोजी रात्रौ ११.०० वा. या कालावधीत बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्याने बंद घराचा फायदा उठवून हा डल्ला मारला. दिनांक ११/०७/२०२६ रोजी संध्याकाळी १९.०९ वाजता याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचा कोडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील दोन बेडरूममधील कपाटे उचकटण्यात आली. कपाटात ठेवलेली मौल्यवान चांदीची भांडी आणि रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली. या घटनेनंतर फिर्यादी श्री. अविनाश भालचंद्र बोंद्रे यांच्या तक्रारीवरून देवरुख पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ अन्वये (तसेच भा.दं.सं. १८६० चे कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे) गुन्हा रजिस्टर नंबर १०१/२०२६ नुसार दाखल केला आहे. अन्य तीन घरफोडीची अजून नोंद झाली नसल्याचे समजते. या चोरी प्रकरणी अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी देवरुख पोलीस परिसरातील संशयितांची चौकशी करत असून पुढील तपास सुरू आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.