loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी आम. डॉ. राजन साळवी यांंचा ‘एकसष्टी सोहळा’ उत्साहात

रत्नागिरी, (वार्ताहर): जनतेच्या गळ्यातील ताईत, राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे माजी आमदार तथा शिवसेना अकोला लोकसभा संपर्क प्रमुख डॉ. राजन प्रभाकर साळवी यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त साळवी कुटुंबियांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘एकसष्टी सोहळा’ गुरुवार, दि. ९ जुलै रोजी रत्नागिरी येथील हॉटेल विवेक येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि अभूतपूर्व वातावरणात संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सोहळ्यासाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासह विविध भागांतून हजारो नागरिक, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या, पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिनिधी, मित्रपरिवार आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

उपस्थित मान्यवरांनी डॉ. राजन साळवी यांना पुष्पगुच्छ अर्पण करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. हा ’एकसष्टी सोहळा’ केवळ वाढदिवसाचा कार्यक्रम न ठरता कार्यकर्ते, नागरिक आणि हितचिंतकांनी व्यक्त केलेल्या प्रेम, कृतज्ञता आणि विश्वासाचा अविस्मरणीय उत्सव ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg