loader
Breaking News
Breaking News
Foto

अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निषेधार्थ 24 जुलै रोजी खेड येथे भव्य निदर्शने

खेड, - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) खेड तालुक्याच्या वतीने अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात शुक्रवारी, दि. 24 जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता खेड तहसीलदार कार्यालयावर भव्य निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. या आंदोलनात खेड तालुक्यातील सर्व भीमसैनिक, युवक, महिला, विद्यार्थी, सामाजिक व धार्मिक संघटना तसेच संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) खेड तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आंदोलनादरम्यान तहसीलदार यांच्यामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात येणार असून, अनुसूचित जातींचे घटनात्मक हक्क अबाधित ठेवावेत, सामाजिक न्यायाचे संरक्षण करावे आणि कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधित घटकांशी व्यापक चर्चा करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) खेड तालुक्याच्या वतीने हे आंदोलन शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने करण्यात येणार असून, सर्व नागरिकांनी या निदर्शनात सहभागी होऊन सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन खेड तालुका रिपब्लिकन पक्षाचा वतीने करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg