loader
Breaking News
Breaking News
Foto

पॅरिस येथील जीआकोमो ली बुर्जीईस यांचे सरफरे विद्यालयात इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन

संगमेश्वर - बुरंबी येथील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या दादासाहेब सरफरे विद्यालय व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता५वी ते १२ वी मधील विद्यार्थ्यासाठी इंग्रजी विषयाचे सात दिवसाचे मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. फ्रान्स देशातील पॅरिस मधील जीआकोमो ली बुर्जीईस यांनी दादासाहेब सरफरे विद्यालयातील उपक्रमाने प्रेरित होवून प्रशालेस भेट दिली. सात दिवसाच्या या सत्रामध्ये त्यांनी इंग्रजी उच्चरण स्पोकन इंग्लिश प्रॅक्टिकलबाबत उत्तम मार्गदर्शन केले. इंग्रजी भाषेतील दैनंदिन वापर व आधुनिक अध्यापन पद्धती याविषयी अध्यापन करताना प्रोजेकटर, लॅपटॉप, समाज माध्यमातील विविध अँप यांचा वापर कसा करावा याचे त्यांनी प्रत्यक्षात साधनांचा वापर करून विद्यार्थ्यना संबोधीत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भारतीय शिक्षण पद्धती त्याचप्रमाणे फ्रांसमधील शिक्षणपद्धती याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. ध्येय असेल तर विश्वाची गवसणी घालता येते, यासाठी त्यांनी पाश्चिमात्य देशातील अनेक आदर्श व्यक्तींच्या जडणघडणीची माहिती दिली. करिअर विषयक मार्गदर्शन करताना शालेय शिक्षणाच्या पुढे फ्रान्स देशात कोणते उच्च शिक्षणाचे पर्याय उपलब्ध आहेत, तसेच व्यावसायिक संधी कोणकोणत्या उपलब्ध आहेत याबाबत सविस्तर माहिती दिली. सरफरे हायस्कुलमधील विद्यार्थी व त्यांची कुतुहलता व शिक्षकांप्रती नम्रता हे गुण आवडल्याचे त्यांनी सांगितले. इथले विद्यार्थी संस्कार आणि संस्कृती यांचे छान मिलाप आहेत, असे आवर्जून सांगितले. याचप्रमाणे इथला पहिला पावसाळा, त्याच्या आगमनाची स्थानिक नागरिकांमधील उत्सुकता, शेती विषयक पारंपरिक कामे, स्थनिक नैसर्गिक हिरवागार परिसर, रोजच्या आहारातील विविध मेनू याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.

टाईम्स स्पेशल

जीआकोमो ली बुर्जीईस यांस शुभेच्छा देताना संस्था सचिव शरद गोविंद बाईत, प्राचार्य प्रकाश वीरकर, प्राध्यापक सूरज जाधव यांनी सांगितले की, आपले इंग्रजी विषयी असलेले सखोल ज्ञान, अध्यापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे आधुनिक शिक्षण पद्धतीबाबत विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन लाभले आहे. असेच पुढे या शालेय विद्यार्थ्यना आपणाकडून उत्तम मार्गदर्शन मिळावे, असे सांगितले. यावेळी शालेय कर्मचारी, विद्यार्थी व पॅरिस येथील उच्च शिक्षीत ग्रस्पर्ड ब्रूजीएस यांच्या उपस्थितीत संस्थेकडून सरचिटणीस शरद बाईत यांच्या हस्ते जीआकोमो ली बुर्जीईस यांस संस्थेकडून मानपत्र व शाल श्रीफळ देवून गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg