पनवेल (प्रतिनिधी) - "उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाची भक्कम पायाभरणी... प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशासाठी एक छोटासा प्रयत्न!" या भावनेतून पनवेल महानगरपालिका शाळा क्रमांक २, हुतात्मा हिरवे गुरुजी शाळा (दगडी शाळा) येथील इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची पुस्तके, मार्गदर्शक व प्रश्नसंचांचे वितरण भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरचे सरचिटणीस अनिमेष ओझे यांच्या वतीने या शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची योग्य दिशा मिळावी, दर्जेदार अभ्यास साहित्य सहज उपलब्ध व्हावे आणि अधिकाधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी व्हावेत, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके, मार्गदर्शक, प्रश्नसंच आणि आवश्यक अभ्यास साहित्य भेट देण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर नितीन पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, भाजप पनवेल शहराध्यक्ष तथा नगरसेवक सुमित झुंजारराव, नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, पनवेल शहर सरचिटणीस अमित ओझे, रुपेश नागवेकर, भाजयुमो शहराध्यक्ष हिमेश बहिरा, प्रभागाध्यक्ष अनिमेष पटवर्धन, हर्षल बहाडकर, आशुतोष पाटील, आकाश गाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षण हेच जीवनात यश मिळविण्याचे सर्वात प्रभावी साधन असल्याचे सांगितले. शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता, अभ्यासाची सवय आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करणारी परीक्षा आहे. नियमित अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वास यांच्या बळावर प्रत्येक विद्यार्थी निश्चितच यश मिळवू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्द, मेहनत व चिकाटीने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.